धुळे महानगरपालिका स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवर अपात्रतेची टांगती तलवार; प्रकरण उच्च न्यायालयात

धुळे : धुळे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून नवा वाद उफाळून आला असून, हे प्रकरण आता उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
हृषिकेश वराडे आणि जयेश वावदे या दोन स्वीकृत नगरसेवकांकडे आवश्यक अनुभव नसल्याचा आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तुटी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार, स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
मात्र, हृषिकेश वराडे यांच्याकडे असा अनुभव नसतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली, असा दावा केला जात आहे. त्यांनी सादर केलेले "श्री समर्थ आवजीनाथ बाबा सामाजिक बहुद्देशीय संस्था" या संस्थेचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या सदस्यत्वाच्या तारखांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.
तसेच जयेश वावदे यांनी "बालाजी सोशल फाऊंडेशन, शिरपूर" या संस्थेचा दाखला दिला आहे. नियमानुसार संबंधित संस्था महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे, मात्र ही संस्था शिरपूर येथील असून तिचे कार्यक्षेत्रही तेथेच मर्यादित आहे.
आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.



