MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी25 May 2026

पगार रखडल्याने घंटागाडी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न कचरा ठेकेदारासह मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करणार : अँड. बैसाणे

Photo 1 of 5
1 / 5

धुळे : मेंधेर न्यूज

धुळे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचे पारणे तीन महिन्यांपासून रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पेमेंट मिळावे या मागणीसाठी धुळे महानगरपालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पगार न मिळाल्याने काही आजारी कर्मचाऱ्यांना औषधोपचार मिळत नसल्याने तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने एका घंटागाडी कर्मचाऱ्याने स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली.

यावेळी मनपा प्रशासन व कचरा ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या कर्मचाऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे महानगरपालिकेअंतर्गत घंटागाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. सोमवारी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते.

यावेळी रस्त्यावर (३२) मुख्य आत्मदहनाचे हे प्रकरण घडले. घंटागाडी चालक असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला पकडून त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर अँड. मयूर बैसाणे यांनी मनपा प्रशासन आणि संबंधित कचरा ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत असून औषधोपचारही करू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी धुळे महानगरपालिका प्रशासन व संबंधित कचरा ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे