MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी

विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पती, सासू व सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील सानप व बैसाणे यांच्या युक्तिवाद

Photo 1 of 1

धुळे (दै. पोलिस शोध) - सासरे राजेंद्र खैरनार, सासू व पती हेमंत खैरनार यांनी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ८५, ३५२, ३५१ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत दर्शन हेमंत खैरनार हिचा पती हेमंत याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे मयतास मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजय सानप व अँड. मयूर बैसाणे यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती यास्मिन देशमुख यांनी तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे