MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी22 Mar 2025

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीचा जामीन पुन्हा नामंजूर

सरकारी वकील निलेश कलाल, अँड. मयूर बैसाणे यांचा प्रभावी युक्तिवाद

Photo 1 of 1

धुळे | खान्देश खबर

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पती हेमंत खैरनार याचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा नामंजूर केला आहे.

मयत विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती मानसिक त्रासात होती. तिच्या आत्महत्येनंतर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल व अँड. मयूर बैसाणे यांनी आरोपीस जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे