MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी22 Mar 2025

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर

अतिरिक्त सरकारी वकील अँड. निलेश कलाल व अँड. मयूर बैसाणे यांचा प्रभावी युक्तिवाद

Photo 1 of 1

धुळे (श्रमराज्य.कॉम) - विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा नामंजूर करण्यात आला.

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी हेमंत खैरनार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत विवाहितेचा छळ, विवाहबाह्य संबंध आणि मानसिक त्रास या कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

सरकारी पक्षातर्फे अँड. निलेश कलाल आणि फिर्यादीतर्फे अँड. मयूर बैसाणे यांनी आरोपीचा जामीन नाकारावा अशी मागणी केली. न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे